Saturday, 22 December 2012

हा अजून एक बलात्कार आहे.....



आज वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर सगळया काही बलात्काराच्याच बातम्या ..... असे वाटते कि जणू काही आजच खूप मोठे बलात्कार होत आहेत.... आणि ह्या वरती तरुण तुर्क आणि म्हातारे .. त्यांचे काही विचार, मतं मांडत आहेत... काय करावे आणि काय करू नये याच्यावरतीच आमची अजूनही लढाई सुरु आहे.... सगळ्या डोक्याचाच बलात्कार झालाय...अश्यातच आज ऑफिसमधील एक प्रिंटआऊट वाचनात आली. खूप मस्त लिहिलं होत, जरा तुमच्यापर्यंतपण पोहचउ वाटलं म्हणून पहा वाचून......


सत्तर वर्षाच्या आजीला 
कोर्टाच्या पायरीवर उभी असलेली बघून 
मी तिला विचारलं 
आजी तुम्ही इथं कशा 
आजी मला म्हणाली 
बाबा,सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला 
होता आज त्याचा निकाल आहे.

३२ न्यायाधीश २० वकील 
४० शिरस्तेदार बदलून गेले 

निम्मे आरोपी मरून  गेले 
बाकीचे केंव्हाच पळून गेले 

तरीही मी जिवंत आहे 
हीच एक कमाल आहे.

सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 
आज निकाल आहे 

भगवान के घर दर है,
हि म्हण जराही बदलली नाही,
न्यायदेवतेची पट्टी जरासुद्धा सरकली नाही,
आंदोलने तेंव्हापण झाली 
नंतर कुणी फिरकलं नाही,
तरीही वाटतं  जीवनाची आज सकाळ आहे
सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे.

थरथरत्या हाताला धरून म्हातारीला उभं केलं 
निकाल ऐकण्यासाठी चार भिंतींच्या आत नेलं 
निकाल ऐकुण म्हातारीचे पाय लटपटू लागले 
पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले 
ज्यांना शिक्षा झाली ते तर कधीच मरून गेले 

सत्तर वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे 
सतराव्या वर्षी झालेल्या बालात्कारावर 
न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार आहे.

                                    - कवी प्रकाश पाठारे. 

Sunday, 16 December 2012

" नादब्रम्ह "



पटत नाही मनाला, कि आजही अशी माणसे आहेत कि ज्यांच्यामुळे आपण साक्षात ईश्वराला भेटू शकतो. खरंच संगीतात इतकी जादू असते कि आपण कधी त्यात तल्लीन होऊन जातो हेच कळत नाही. " नादब्रम्ह " काय असतं हे आज उमगल. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यात आज संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं वादन ऐकत असताना जणू ईश्वर आपल्याला भेटल्याचा आनंद होतो. आणि याच ईश्वराबरोबर बोलण्यात किंवा आपल्या भावना त्या ईश्वरापर्यंत पोहोचवण्यात संगीतात खूप ताकद असते. आजकाल मंदिरातहि जाऊन जी मनःशांती मिळत नाही ती या महोत्सवात मिळाली. जिथे रसिक आणि संगीतांचे देव यांचे मिलन होते. ज्या प्रकारे पंडितजी रसिकांना आपल्या वादनात तल्लीन ठेवतात आणि जसजसा संगीताचा स्वर वाढत जातो तसतशी ईश्वराला भेटण्याची त्यात गुंग होण्याची चढाओढ होत राहते.
     खरं तर संज्ञापनाची पदवी घेत असतांना संज्ञापन, जनसंज्ञापन काय आणि कसं असतं हे शिकलो. पण बोधनशास्त्रानुसार पंडितजींच वादन ऐकत असताना अस जाणवलं कि संज्ञापन किंवा जनसंज्ञापन हे या मार्गाने खूप उत्तम प्रकारे होऊ शकते. 
     मला संगीतातलं फारस कळत नाही. पण ज्या प्रकारे आपण ते मन लावून  ऎकतो तसा त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. कितीतरी वेळाचे मनन, चिंतन केल्याचे फायदे एकत्र एकाच वेळी होतात. आज ज्याप्रकारे तरुण पिढी D.J. च्या तालावर नाचत भरकटत चालली आहे. अश्या तरुणांना ह्या महोत्सवाद्वारे आत्मशुद्धी करून घेण्याची हि एक चांगली संधी होती.  

Sunday, 2 December 2012

माझे विचार, माझे लेखन...

मित्रांनो जर तुम्हाला माझे विचार, माझे लेखन वाचायचे असतील . तसेच त्यावर आपला अभिप्राय नोंदवायचा असेल किंवा एखादी टिपण्णी करायची असेल तर मला http://rohitbhise.blogspot.in/ या blog  वरती follow करा. ( यासाठी मला marks सुद्धा आहेत बरं का)

Please
http://rohitbhise.blogspot.in

पुन्हा लिखाणाला प्रारंभ......

अस वाटत कि बहुतेक  या थंडीच्या दिवसात माझे विचार गोठले का शब्द गारठले हेच काळात नाही. मनात खूप काही असत पण ते व्यक्त करता येत नाही. एखादा चांगला मार्ग मिळावा आपले विचार प्रकट होण्यासाठी, एक सुरुवात हवी आहे. एक सुरुवात जी करेल माझे मत व्यक्त या लिखित मार्गाने. खूप झालं  निश्चय करून. आता प्रारंभ करायला हवा नव्याने, पुन्हा त्याच जोमाने कामाला लागायला हवे. थोडं थोडं का होईना लिहिलं गेल पाहिजे. यासाठी आजपासूनच लिखाणाला सुरुवात करतो आहे. आज माझा पुन्हा लिखाणाला प्रारंभ......

Wednesday, 12 September 2012

विद्यार्थ्यांचे विद्यापीठात मागण्यांसाठी आंदोलन
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 12, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - विद्यापीठातील रिफेक्‍टरीचे खासगीकरण रद्द करण्यात यावे, वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थिनींना वेळेचे बंधन घालू नये, तसेच जयकर ग्रंथालयातील अभ्यासिकेचा दुसरा मजला सुरू करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट असोसिएशन या विद्यार्थी संघटनेने मंगळवारी आंदोलन केले.

रिफेक्‍टरीबरोबरच विद्यापीठातील विविध उपाहारगृहातील अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालावे, विद्यापीठात इंटरनेट सुविधा (वायफाय) तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. विद्यार्थ्यांनी जयकर ग्रंथालयापासून मुख्य इमारतीपर्यंत मोर्चा काढला. या वेळी कुलसचिव डॉ. सी. एम. चितळे, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. जयकर ग्रंथालयापासून निघालेला मोर्चा मुख्य इमारतीसमोर आल्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. उपहारगृहचालकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जातात, अरेरावीची भाषा वापरली जाते, अशा तक्रारी या वेळी करण्यात आल्या.

प्रशासनाचा निषेध म्हणून या विद्यार्थ्यांनी आज काळ्या फिती लावून आंदोलन केले. रिफेक्‍टरीसह सर्व मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

विद्यापीठातील रिफेक्‍टरी खासगी कंत्राटदाराला चालविण्यासाठी देण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. विद्यापीठानेच रिफेक्‍टरी चालवावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी विद्यापीठामार्फत रिफेक्‍टरी चालविण्यात येत असे. मात्र सुमारे आठ वर्षांपूर्वी विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यापीठाऐवजी खासगी ठेकेदाराकडे रिफेक्‍टरी चालविण्यासाठी देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी समन्वयक
विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजावून घेत प्रशासनाशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे योग्य ते प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sunday, 2 September 2012

कायदाच अजूनही सर्वश्रेष्ट

कायदाच अजूनही सर्वश्रेष्ट :-
           गेल्या २/3 दिवसांपासून न्यायालय महत्वपूर्ण खटल्यांचे निकाल देत आहे. त्यात विविध पक्षाचे माजी/आजी आमदार, मंत्री, संघटनाप्रमुख, अतिरेकी दोषी ठरवून त्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे, आपला कायदा खूप कडक असून सर्वाना समान न्याय देतो याची जाणीव आता निश्चित सर्वाना होईल. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजे न्यायपालिका. आपली न्यायपालिका खूप बळकट आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

Monday, 27 August 2012


निकृष्ट जेवणावरील उत्तरेही मिळमिळीत
- सकाळ वृत्तसेवा
Monday, August 27, 2012 AT 12:22 AM (IST)
Tags: pune university,   food,   student,   pune
पुणे - ""पुणे विद्यापीठाच्या रिफेक्‍टरीत मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाविषयी विद्यापीठ प्रशासनाकडे आम्ही केलेल्या तक्रारींची वेळेवर दखल घेतली गेली असती, तर आता आम्हाला चांगले जेवण मिळाले असते. मात्र, प्रशासनाकडून "कारवाई करू' असे मिळमिळीत उत्तर नेहमी मिळत राहिले,'' अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी "सकाळ'कडे व्यक्त केल्या.

रिफेक्‍टरीत विद्यार्थी जेवण करीत असताना त्यांच्या भाजीत शनिवारी अळ्या आढळल्या होत्या. हा प्रकार रिफेक्‍टरी समिती अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना अपशब्द वापरत हाकलून दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकला असून, "जेवण बंद' आंदोलन सुरू केले आहे. रविवारी रिफेक्‍टरी एकवेळ सुरू असते. मात्र, तेथे आज एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे रिफेक्‍टरीत शुकशुकाट होता.

""विद्यापीठात विविध समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. त्याची दखल घेतली जात नाही. निकृष्ट जेवणाची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ढिसाळ कारभारामुळेच जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत गेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे विद्यापीठाचे काम आहे.'' ""अडचणीबाबत तक्रार करण्यासाठी गेल्यास अधिकारी हाकलून देतात. "तुला काही समजते का? शिक्षण सोडून तुला हे धंदे सुचतात का?' अशा शब्दात खडसावतात. आम्ही अडचणी सांगायच्या कुणाला,'' असा प्रश्‍न एका विद्यार्थ्याने उपस्थित केला. निकृष्ट जेवणामुळे हॉटेलमध्ये जावे लागते. त्याचा खर्च पेलवत नसल्यामुळे अर्धवेळ काम करावे लागत आहे. जेवण चांगले मिळाले, तर अभ्यासाकडे अधिक लक्ष देता येईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

ऐकावं ते नवल

ऐकावं ते नवल :-
      'पुणे विद्यापीठ' गेल्या काही दिवसांपासून विविध धक्कादायक आणि आश्चर्यचकित गोष्टींमुळे वर्तमानपत्रात येत आहे, मग ते शारीरिकशिक्षण  विभागातील घटना असो वा भोजनागृहातील जेवणात अळ्या आणि शिवाजी उद्यानातील कचरा करणारे पर्यटक अश्या न अनेक कारणांनी विद्यापीठ आपले नाव गाजावतय.
 अरे जे महाराष्ट्रातील सर्वात उच्च दर्ज्याच विद्यापिठ आहे, अश्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या  निघाव्या हि लांछनास्पद गोष्ट आहे. त्यात अधिकाऱ्यांची अरेरावी. खरच खूप वाईट वाटतंय.
      अश्या घटना खरचं आपल्या विद्यापीठाचे नाव खराब करतात का ?
मग याला जबाबदार कोण ??
का होत नाही होत दोषींवर कारवाई ???
कोठे कमी पडतंय विद्यापीठ ????
यावरून विद्यापीठ आपला दर्जा कायम ठेवेल ?????
आपल्याला काय वाटतं ? नक्की सांगा.

Tuesday, 21 August 2012

मोर्च्याच राज-कारण

        आज जे काही राजसाहेबांनी मोर्च्या द्वारे जनसामान्य नागरिकांच्या मनातील उद्द्वेश बाहेर आणला तेहि शांततेच्या मार्गाने खरचं हे कौतुकास्पद आहे. त्यानंतर त्यांच्या मोर्च्याच जे काही राजकारण उठलं ते पण विशेष आहे. 'विरोधक' कसा असावा याच उत्तम उदाहरण राजसाहेब आहेत. आजपर्यंत मनसे म्हणजे 'खळं-फटयाक' एवढंच वाटत होत. पण या मोर्च्याच्या आधारे त्यांनी शांततेचा मार्गाने सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे. खरंच त्यांनी महाराष्ट्र धर्म भारताला दाखवून दिला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.....

Monday, 13 August 2012

१५ ऑगस्ट

rohit.bhise.75@facebook.com
१५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिन  आला आहे....... त्या पार्श्वभूमीवर इतिहासाचा विचार केल्यावर जे जे स्वतंत्र सैनिक अथवा राष्ट्रपुरुष यांची आणि  जे स्वराज्यासाठी http://www.facebook.com/groups/262968313816238/ढले....अश्या  काही  थोर राष्ट्र नेत्यांची वाकये मला आठवतात आणि आवडतात........ 

तुम्हालाही ते नक्कीच आवडतील ...............

" भारत मातेच्या स्वातंत्रासाठी मी कुठलीही शिक्षा भोगायला  तयार आहे "........ (स्वा.विनायक दामोदर सावरकर  )

" तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आज़ादी दूंगा ".........(सुभाषचंद्र बोस)

"अहिंसा परमो धर्म "...............(म. गांधी)


" स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "......(लोकमान्य टिळक)

 " माणुस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो ". .......(डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

" शिका, संघर्ष करा, संघटित व्हा "........(डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही "......(लोकमान्य टिळक)

" मैं अपनी झांशी नहीं दुंगी "..........(झाशीची राणी )

" आधी लगीन कोंढाण्याच मग, रायबाच "..........(तानाजी मालुसरे )

अजून काही प्रेरणा देणारी वाक्ये.....

सायमन go  back.....
भारत छोडो.......
इंकलाब ...... जिंदाबाद .......
वंदे मातरम........

तुम्हाला अजून काही  असं सुचल तर नक्की share करा.......http://www.facebook.com/groups/262968313816238/

Thursday, 2 August 2012

Sunday, 29 July 2012