Saturday, 22 December 2012

हा अजून एक बलात्कार आहे.....



आज वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर सगळया काही बलात्काराच्याच बातम्या ..... असे वाटते कि जणू काही आजच खूप मोठे बलात्कार होत आहेत.... आणि ह्या वरती तरुण तुर्क आणि म्हातारे .. त्यांचे काही विचार, मतं मांडत आहेत... काय करावे आणि काय करू नये याच्यावरतीच आमची अजूनही लढाई सुरु आहे.... सगळ्या डोक्याचाच बलात्कार झालाय...अश्यातच आज ऑफिसमधील एक प्रिंटआऊट वाचनात आली. खूप मस्त लिहिलं होत, जरा तुमच्यापर्यंतपण पोहचउ वाटलं म्हणून पहा वाचून......


सत्तर वर्षाच्या आजीला 
कोर्टाच्या पायरीवर उभी असलेली बघून 
मी तिला विचारलं 
आजी तुम्ही इथं कशा 
आजी मला म्हणाली 
बाबा,सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला 
होता आज त्याचा निकाल आहे.

३२ न्यायाधीश २० वकील 
४० शिरस्तेदार बदलून गेले 

निम्मे आरोपी मरून  गेले 
बाकीचे केंव्हाच पळून गेले 

तरीही मी जिवंत आहे 
हीच एक कमाल आहे.

सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 
आज निकाल आहे 

भगवान के घर दर है,
हि म्हण जराही बदलली नाही,
न्यायदेवतेची पट्टी जरासुद्धा सरकली नाही,
आंदोलने तेंव्हापण झाली 
नंतर कुणी फिरकलं नाही,
तरीही वाटतं  जीवनाची आज सकाळ आहे
सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे.

थरथरत्या हाताला धरून म्हातारीला उभं केलं 
निकाल ऐकण्यासाठी चार भिंतींच्या आत नेलं 
निकाल ऐकुण म्हातारीचे पाय लटपटू लागले 
पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले 
ज्यांना शिक्षा झाली ते तर कधीच मरून गेले 

सत्तर वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे 
सतराव्या वर्षी झालेल्या बालात्कारावर 
न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार आहे.

                                    - कवी प्रकाश पाठारे. 

No comments:

Post a Comment