Sunday, 16 December 2012

" नादब्रम्ह "



पटत नाही मनाला, कि आजही अशी माणसे आहेत कि ज्यांच्यामुळे आपण साक्षात ईश्वराला भेटू शकतो. खरंच संगीतात इतकी जादू असते कि आपण कधी त्यात तल्लीन होऊन जातो हेच कळत नाही. " नादब्रम्ह " काय असतं हे आज उमगल. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यात आज संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं वादन ऐकत असताना जणू ईश्वर आपल्याला भेटल्याचा आनंद होतो. आणि याच ईश्वराबरोबर बोलण्यात किंवा आपल्या भावना त्या ईश्वरापर्यंत पोहोचवण्यात संगीतात खूप ताकद असते. आजकाल मंदिरातहि जाऊन जी मनःशांती मिळत नाही ती या महोत्सवात मिळाली. जिथे रसिक आणि संगीतांचे देव यांचे मिलन होते. ज्या प्रकारे पंडितजी रसिकांना आपल्या वादनात तल्लीन ठेवतात आणि जसजसा संगीताचा स्वर वाढत जातो तसतशी ईश्वराला भेटण्याची त्यात गुंग होण्याची चढाओढ होत राहते.
     खरं तर संज्ञापनाची पदवी घेत असतांना संज्ञापन, जनसंज्ञापन काय आणि कसं असतं हे शिकलो. पण बोधनशास्त्रानुसार पंडितजींच वादन ऐकत असताना अस जाणवलं कि संज्ञापन किंवा जनसंज्ञापन हे या मार्गाने खूप उत्तम प्रकारे होऊ शकते. 
     मला संगीतातलं फारस कळत नाही. पण ज्या प्रकारे आपण ते मन लावून  ऎकतो तसा त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. कितीतरी वेळाचे मनन, चिंतन केल्याचे फायदे एकत्र एकाच वेळी होतात. आज ज्याप्रकारे तरुण पिढी D.J. च्या तालावर नाचत भरकटत चालली आहे. अश्या तरुणांना ह्या महोत्सवाद्वारे आत्मशुद्धी करून घेण्याची हि एक चांगली संधी होती.  

No comments:

Post a Comment